Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

श्री समर्थ मालिक – व्यक्ती आहे, त्याप्रमाणे व्यक्तीची छाया आहे. छाया म्हणजे काय? वृक्ष असेल तर त्याची पण छाया आहे. ज्याठिकाणी मनुष्य, …

काही ज्योतीना अनुग्रह प्रयासाने मिळतो, त्याची किंमत त्यांना कळते आहे. काही ज्योतीना त्यांच्या संचिताप्रमाणे सहजासहजी मिळतो, त्याची योग्यता त्यांना भासत नाही, पण …

श्री समर्थ मालिक – कोणत्याही परिस्थितीत आसनावरून जे सांगितले जाते, त्याच्यावर सेवेकऱ्याने आत-बाहेर न करता श्रद्धेने वाटचाल करावी, मग त्याला अडचणी येणार …

तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

जड आहे तर भक्ती आहे ©️

जड आहे तर भक्ती आहे ©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी म्हणतात कि, मालिक तुम्हीच करून घेणार आहात. पण हे तत्व कसे आहे कि, यात कोणीही मिलन होऊ शकणार नाही. सतमय जे आहे तेच सत् ! तेच ब्रह्म ! तेच समर्थ ! आपल्यातच आहेत. तेच आपणाला उपदेश सांगतात. म्हणून दिलेला अखंड नामाचा उजाळा करणे, पण ते कोणी करीत नाही.

स्थुलाला स्थुलाची जशी आवश्यकता आहे, तशी स्थुलाला चंदनमय बनण्याची सुद्धा आवश्यकता आहे. ते चंदनमनय बनवण्याचा प्रयत्न करा.

जोपर्यंत चेतना, तोपर्यंतच आपण, आप आणि पर म्हणतो, पण ती चेतना शक्ती कोणाच्या कृपेने आहे, तर सताच्या, समर्थांच्या कृपेने ही चेतना शक्ती आहे. ही चेतना शक्ती बाहेर पडली, तर मग स्थुलाचा काही उपयोग नाही.

म्हणून समर्थ म्हणतात, मी तुमच्यातच वास करीत आहे. हे जडत्व दिले ते मला पाहण्यासाठीच दिले आहे. जर पाहता आले नाही, तर हे सर्वस्व निष्फळ आहे. जडत्व आहे ते बुद्धिवान पाहिजे. जागृत पाहिजे. सन्मार्गी ज्योत सदा जागृत असते. ती क्षणिक लोभाला फसणार नाही. मोहाला फसणार नाही. जड मौलिक आहे तर, जडासाठी तहानलेले असले पाहिजे की नाही? जड आहे तर भक्ती आहे. ©️

You cannot copy content of this page