चौकट मुनी – गजेंद्राच्या भक्तीसाठी लक्ष्मी नारायण, या ठिकाणी माऊलीच्या स्थानाजवळ स्थीर झाले. त्या ठिकाणी जे तळे आहे, तेथे नारायणाचा अंश प्रत्यक्ष प्रगट आहे.
पूर्वी जी तळ्यात ज्योत खेचली जात होती, आता ती खेचली जाणार नाही. आपणांस रामनवमीच्या दिवशी स्थापना करण्यास हरकत नाही.
गजेंद्राचे स्थान वालावल गावाच्या खाली जवळ जवळ सात (७) मैलावर नदीच्या बाजूला थोड्याशा अंतरावर डोंगर आहे, त्या ठिकाणी वास्तव्य होते. (ते) मानवच होते, पण थोड्याशा (कृतीसाठी) गजेंद्र झाले.
हा इतिहास सांगण्यात येईल. तो सर्वस्वी सत्य वृत्तांत आहे. वालावलच्या पश्चिमेला, त्या ठिकाणी हल्ली गजेंद्रचा वास आहे. परंतु वैदिक धर्माचे अस्तित्व ठेवण्यासाठी गजेंद्रला स्थलांतर करावे लागले व त्या तऱ्हेचा त्याला आदेश देण्यात आला.
अलख – गजेंद्राच्या भक्तीला भुलून, वास्तव्य करावे लागले. ऋषीकुलाना गुप्तता राखण्यासाठी ताकीद दिली. ऋषीकुळांना वेगळया तऱ्हेने दर्शन देण्यात आले. चौकट मुनींची माहिती मोकळे करण्याला हरकत नाही.
दोन वर्षापूर्वी दरबारात चुणूक दाखविण्यात आली होती. ह्या ऋषीची जाणीव दिली होती. पिंपळाच्या झाडाजवळ विहीर आहे. महापुरुष म्हणतात ते ठिकाण. त्यांना सर्वस्व जाणीव होती. त्यांना दर्शनही मिळाले. महापुरुष त्याच ठिकाणी गुरुकुल आहे. लक्ष्मीनारायणाची स्थापना होईल, तेव्हा या महापुरुषाचे नाव प्रगट होईल. आपणाला पूर्णत्वाने सर्वस्वाची जाणीव मिळेल.
रामनवमीच्या दिवशी स्थापना करु. शुद्ध, प्रत्यक्ष त्रिभुवन व्याप्त शक्ती वास करीत होती. गजेंद्राने नाना तऱ्हेचे अवतार घेतले. दर्शन घेण्यासाठी अशा तऱ्हेचे करावे लागले. ज्या ठिकाणी स्थीर झाले, त्याच ठिकाणी वास आहे. राक्षसांचे अस्तित्व खतम केले. राक्षसांचे अस्तित्व होते तोपर्यंत याच स्थितीत होते. राक्षस मारावयास आले असताना भुजंग स्वरूप घेतले. ©️