श्री विठ्ठल – आम्ही अवतार कार्य घेतो, ते कशासाठी? आदेशाशिवाय आम्ही अवतार कार्य घेतलेले नाही. सताचा नाहक छळ झाला म्हणजे, अवतार कार्य होते. म्हणून सर्वांना उत्पन्न करणारा, तारणारा सर्वभूतेषु पश्य एकच तत्व आहे, त्यांचेच आपण सेवेकरी आहोत. मी तू एकच आहे. फक्त नवा अन् जुना एवढाच फरक आहे. ज्या तऱ्हेची ज्योत त्याप्रमाणे अधिकार अन् त्याप्रमाणे ठेवण असते.
मानव जडत्व आहे. मायातीत आहे. संसारी आहे म्हणून त्याला वाटते काहीतरी विशेष आहे. मी करतो सवरतो आहे, म्हणून हे चालले आहे. पण हे सर्वस्व अज्ञान आहे. सुज्ञान मानव असे केव्हाही म्हणणार नाही. पण अज्ञानाचा डामडौल मोठा असतो. पण जोपर्यंत गाडा सुरळीत चालतो तोपर्यंतच तो माझे माझे म्हणतो. गाडा उलटला की मग धावाधाव करतो. मग त्याला काही करता येत नाही. म्हणून त्यांना ज्या मार्गाची जाणीव झाली, मार्ग मिळाला त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न सेवेकऱ्यांनी करणे. इतकेच सांगणे आहे.
सर्व जगमय काय आहे? चैतन्य स्वरूप आहे, निर्विकार आहे, त्यानंतर ओंकार आहे. ओंकारातून माया, माये पासून त्रिगुण. तेच चैतन्य सत् तत्व सर्व ठिकाणी व्यापक आहे. (समाप्त)