गुरू कोणाला म्हणावे? कसा असावा?
अनेक अनेक (गुरू) होऊन गेलेत. होणार आहेत. मानव ज्योत आपणाला सत् मार्ग, सत् आचरण, सत् बनविण्याच्या मार्गाला आहे. तेच सत् गुरु असे कोण? याच्या शोधाची प्रत्येक सेवेकऱ्याची धडफड आहे.
सत् गुरु कसे?
सत् आचरण, सात्विकता ज्याच्या रोमारोमात भिनली आहे असे ते सत् गुरु होय. ज्याने आपल्या वाणीने बीजारोपण करुन सर्वस्वाचा ठाव घेतला, ते सत् गुरु होय. ते ओळखण्या साठी सत् शिष्य असावा लागतो. तेव्हाच ओळख होते. ओळखण्यासाठी ज्याने ज्ञानाचे बीजारोपण केले, ज्ञान वृक्षाची भरभराट केली, तेच सद्गुरु होय. ते ओळखण्यासाठी सत् वाणी, सत् आचरण अशा तऱ्हेने त्यांच्या जवळ जाण्यासाठी सत् शिष्याची धडपड असते. या धडपडीने जो ऋणानुबंध, तो साधल्यानंतर शिष्याची तृप्ती होते.
सद्गुरूंचा शोध प्रत्येक शिष्याने करावयाचा असतो. नुसत्या ऋणानुबंधाने ठाव घेणे शक्य नाही. आपल्या ठिकाणीं असणाऱ्या अमृततुल्य ठेव्याचा जो उपयोग करतो, त्याला सदगुरू दूर नाहीत. याच्याच योगाने त्यांना पहावयाचे असते. स्व अनुभव हा श्रेष्ठ आहे. सत् वाणीने, सत् वृत्तीने बीजारोपण केल्यानंतर सद्गुरु दूर नाहीत.(समाप्त) ©️