ती नामाने अखंड भरली म्हणजे सर्व ठिकाणी प्रकाश फाकेल. मग कोणत्याही बाबतीत सेवेकऱ्यांना न्यूनता भासणार नाही. पण, तितकी तयारी झाली पाहिजे.
पूर्वीच्या युगात महान महान सेवेकरी होते. ते अखंड सेवेत, गतीत निमग्न झाले, सेवामय झाले, भक्तीमय झाले. त्याप्रमाणे आताच्या युगात कोणी दिसत नाही. आहे कोणी असा की ज्याची तिजोरी भरून वाहत चालली आहे. अखंड असे सत्पुरुष आहेत का? पण ते ऋद्धी सिद्धीच्या पाठीमागे आहेत. ते मानवांना चमत्कार दाखविण्यासाठी, नावाला हपापलेले असतात.
भक्तीला असे काही एक लागत नाही. लागते, पण एकच ! मनाची शुद्धता !! ती शुद्धता असल्यानंतर मन गढूळ करण्याची काय आवश्यकता? मनाच्या चाकोरीने अंगावरचे वस्त्र रंग देऊन भगवे करावयाचे असते, पण मुळात ते शुभ्रच असते. मग त्याला रंग चढविण्याची काय आवश्यकता? रंग तो कशाला? तर मानवाने त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी हे केलेले असते.
भक्तीला सोंगं ढोंगं काही नको. मनाची भावना सत् शुद्ध ठेवली तरच त्या भक्तीचा उपयोग. मनुष्य हाच ईश्वर आहे. त्याच्याच अंत:र्यामी मानवात ते आहेत, जे ईश तत्व मानवाच्या अंत:र्यामी आहेत, त्याची ओळख करून घेणे. तोच ईश्वर आहे.(समाप्त) ©️